औरंगाबाद : लसींच्या तुटवड्यामुळे शहरात वारंवार लसीकरण खंडित होत आहे. मंगळवारी पालिकेकडे दहा हजार लसींचा साठा आला होता. मात्र दिवसभरात हा साठा संपला. उरलेल्या ५०० लसींच्या साठ्यातून बुधवारी प्रोझोन मॉल याठिकाणी लसीकरण झाले. मात्र अजूनही लसींचा साठा आलेला नाही. त्यामुळे लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या तब्बल ५० हजार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुसरा डोस लवकरात लवकर मिळेल कि नाही याबाबत अनेकांमध्ये संभ्रम पसरला अाहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांकडून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वारंवार लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे. गेल्या आठवड्याभरात केवळ दोन ते तीनच दिवस लसीकरण सुरु होते. आत्तापर्यंत १५, १२, १० हजार अनुक्रमे लसींचा पुरवठा झाला. मात्र लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एकच दिवसात हा साठा संपत आहे. बुधवारी (दि.७) शहरातील प्रोझोन मॉल याठिकाणी लसीकरण सुरु होते.
आता कोविशिल्ड लसींचा साठा संपल्यामुळे तेही बंद करण्यात आले आहे. मात्र शहरातील तीन केंद्रांवर कोवॅक्सिन लसींचे लसीकरण सुरु आहे. २२ जूनपासून तरुणांचे लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र त्याआधी लस घेतलेल्या ४५ प्लस नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी मॅसेज येत आहेत. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे त्यांच्यावर ताटकळण्याची वेळ आली आहे. शहरात मनपाने ८२ लसीकरण केंद्र उघडून ठेवले आहेत. दिवसभरात मनपा २० हजार जणांचे लसीकरण करु शकते. मात्र सध्या मिळणारा साठा पाहता एकुणच परिस्थिती अवघड आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बारावी निकालाच्या मुल्यमापन आरखड्यातील त्रुटी दुरुस्त करा, मुख्याध्यापकांची बोर्डाकडे मागणी!
- केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी मोदींवरच केला हल्लाबोल ! वाचा नेमकं काय आहे प्रकरण
- जमीनीच्या वादातून भावाला मारहाण करणाऱ्याला पोलिस कोठडी
- भाजपमधून बाहेर पडलं तर काय त्रास होतो हेच त्यांना दाखवायचंय; भुजबळांचा आरोप
- आठवडाभरात औरंगाबादेतून चोरट्यांनी चार दुचाकी लांबविल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

