बुलडाणा : केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर मंत्रिमंडळातील जुन्या आणि नव्या मिळून महिला मंत्र्यांची संख्या ११ झाली आहे. त्यामुळे मोदी सकरारमध्ये खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करण्याचे काम झाले असल्याचा दावा आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. नुसतेच शब्दातून नाही तर कृतीतून महिला सक्षमीकरण करण्यात आले असल्याचेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार बुधवारीच झाला आहे. या विस्तारानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील महिलांची संख्या लक्षणीय झाली आहे. वास्तविक यंदाच्या लोकसभेतही आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला खासदार आहेत. आता मंत्रिमंडळातील महिलांचे स्थानही वाढले आहे. या संदर्भात आमदार महाले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, ‘शब्दातून नाही तर कृतीतून महिला सक्षमीकरण. केंद्रीय मंत्रीमंडळात जुन्या व नव्या मिळून ११ महिलांचा समावेश.’
इतकेच नाही तर त्यांनी यामध्ये मंत्रिमंडळात समावेश असलेल्या ११ महिलांचे छायाचित्र असलेला एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या महिला मंत्र्यांचाही समावेश आहे. यात महाराष्ट्रातील डॉ. भारती पवार यांच्या नावाचाही समावेश आहे. सध्या डॉ. भारती पवार या महाराष्ट्रातून एकमेव केंद्रीय महिला मंत्री आहेत.
महत्त्वाच्या बातमी
- बारावी निकालाच्या मुल्यमापन आरखड्यातील त्रुटी दुरुस्त करा, मुख्याध्यापकांची बोर्डाकडे मागणी!
- केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी मोदींवरच केला हल्लाबोल ! वाचा नेमकं काय आहे प्रकरण
- जमीनीच्या वादातून भावाला मारहाण करणाऱ्याला पोलिस कोठडी
- भाजपमधून बाहेर पडलं तर काय त्रास होतो हेच त्यांना दाखवायचंय; भुजबळांचा आरोप
- आठवडाभरात औरंगाबादेतून चोरट्यांनी चार दुचाकी लांबविल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

