Share

नारायण राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी सेनेला फरक पडत नाही – वैभव नाईक

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

राणेंचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्याकाळात शिवसेना आणि भाजपची युती देखील होती. मात्र, आता शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर राणे हे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेबाबत सातत्याने आक्रमक टीका करत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे एकप्रकारे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने नारायण राणे यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे का ? अशी चर्चा सुरु आहेत.

यावर शिवसेनेचे आमदार आणि राणेंचे राजकीय विरोधक वैभव नाईक यांनी नारायण राणेवर सडकून टीका केली आहे. ‘राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी सेनेला फरक नाही. याआधीच सेनेनं, कोकणानं राणेंना धडा शिकवलाय,’ अशा शब्दांमध्ये वैभव नाईक यांनी राणेंच्या नियुक्तीने कोकणाच्या राजकारणात विशेष फरक पडणार नसल्याचे संकेत देत राणेंवर हल्लाबोल केलाय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!