लातूर : देशात दिवसेंदिवस रस्ता अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघाताची कारणे जाणून घेऊन त्यांना रोखण्या करिता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून iRAD (Integrated Road Accident Database) अॅप तयार करण्यात आहे. रस्ते अपघात कमी करणे आणी त्यांचे विश्लेषण करणे या साठी या मंत्रालयाने नवीन प्रणाली विकसित केली आहे. या प्रकल्प अंतर्गत लातूर जिल्ह्यातील झालेल्या अपघाताची माहिती मोबाइल अॅपच्या माध्यमातून संकलित केली जात आहे. यासाठी राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, लातूर (NIC) विभागा तर्फे लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासनातील अधिकारी, इन्व्हिस्टिगेशन ऑफिसर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (DyRTO) मधील १४० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बी.एस. दौलताबाद यांनी दिली.
लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचे प्रशिक्षण सुरू असून जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय येथे या प्रोजेक्टचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी लातूर जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून एपीआय सुरज गायकवाड यांची तर एन आय सी अंतर्गत प्रशिक्षणासाठी मधुरा भोयरेकर यांची रोल आऊट मॅनेजर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
iRAD अॅपच्या माध्यमातून अपघाताची माहिती संकलित करणे सोयीचे ठरत आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अपघात स्थळी दाखल होऊन अपघाताची माहिती भरत आहेत. या अॅपद्वारे ब्लॅक स्पॉट बद्दल चा डेटा देखील एकत्रित केला जात आहे, असे दौलताबाद यांनी सांगितले.
अपघातानंतर काही क्षणात अपघाताची माहिती संबंधित यंत्रणेला मिळत आहे त्यामुळे त्याची कारणे लक्षात घेऊन अपघात कमी कसे करता येतील या संदर्भात उपाय योजना करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे प्रशिक्षण झाले असून पोलीस कर्मचारी अॅपमध्ये माहिती भरत आहेत. वाहन पडताळणी साठी पोलीस डिपार्टमेन्ट कडून आरटीओ यांना अॅप द्वारेच request पाठवली जात आहे. त्यामुळे पोलीस आणि आरटीओ यांचे काम अधिक सोपे झाले आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक अपघाताची नोंद अँप मध्ये करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज – नाना पटोले
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- विरोधकांवर भारी ठरला दानवेंचा ‘चकवा’, रेल्वे राज्यमंत्री पदी मिळवली बढती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

