Share

बारावी निकालाच्या मुल्यमापन आरखड्यातील त्रुटी दुरुस्त करा, मुख्याध्यापकांची बोर्डाकडे मागणी!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सरासरी गुणांच्या आधारे निकाल देण्यात येणार आहेत. औरंगाबाद विभागातील दहावीच्या निकालाचे ९९.८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर इयत्ता बारावी मूल्यमापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात काही त्रुटी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करा. अशी मागणी मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने परीक्षा मंडळाकडे केली आहे.

मूल्यमापन आराखड्यात दहावीच्या तीन अधिकतम गुण असलेल्या विषयांची सरासरी काढून परिशिष्ट १.१ मध्ये रकाना क्रमांक ४ मध्ये १०० पैकी गुण भरल्यानंतर रकाना क्रमांक पाचमध्ये ३० टक्के ऐवजी २४ पैकी गुण भरावे असे प्रशिक्षणात सांगितले गेले आहे. परंतु हा सारांश ३० टक्के न येता तो सारांश २४ टक्के नुसार येत आहे.

त्यामुळे मुलांचे गुण कमी येत आहे. असेच अकरावीच्या गुणांची नोंद करतानाही रकाना क्रमांक ६ आणि ७ मध्ये देखील होत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मूल्याकन आराखड्याच्या त्रुटी दुरुस्त कराव्यात अशी मागणी मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे मराठवाडा अध्यक्ष युनूस पटेल, जिल्हाध्यक्ष मनोहर सुरगडे पाटील, किरण मास्ट, दिलीप धुमाळ, प्रकाश देशमुखसह आदींच्या वतीने बोर्डाकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!