मुंबई : साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज पीडित महिलेच्या दुःखद निधनाची बातमी मिळताच अखंड महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यातच मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील याप्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
एक चक्कार शब्द निषेधार्थ नाही. कुठे काही झालं तर लगेच candle march काढणारे "ते"so called प्रतिष्ठीत आहेत कुठे? त्यात या मुंबईत बक्कळ पैसा कमावणारे bollywoodवाले आहेत कुठे? त्यांना डोक्यावर मिरवणारे सत्ताधारी विरोधक सगळेच त्याविषयी गप्प? सगळे एका माळेचे मणी.
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) September 11, 2021
केदार शिंदे हे अनेक घडामोडींवर केदार आपल्या मार्मिक शैलीमध्ये मत व्यक्त करत असतात. यातच त्याने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘एक चक्कार शब्द निषेधार्थ नाही. कुठे काही झालं तर लगेच candle march काढणारे “ते”so called प्रतिष्ठीत आहेत कुठे? त्यात या मुंबईत बक्कळ पैसा कमावणारे bollywoodवाले आहेत कुठे? त्यांना डोक्यावर मिरवणारे सत्ताधारी विरोधक सगळेच त्याविषयी गप्प? सगळे एका माळेचे मणी’, असे म्हणत त्याने या प्रकरणावर काहीच न बोलता केवळ शांत बसून हे सगळ पाहण्याची भूमिका घेत आहे त्यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा देण्यात यावी, अशी सर्व स्तरातून मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘धनुभाऊ, माध्यमांना ब्लॉक करून काय होणार? परिस्थितीला सामोरे तर जावेच लागेल ना!’
- आता कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्याव्याच लागतील; सदावर्ते यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- ‘शिवसेनेतील नेत्यांकडूनच मुख्यमंत्री ठाकरेंची दिशाभूल’, मुनगंटीवार यांची टीका
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय


