मुंबई : स्थानिक संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली होती. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर गदा आल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला असून ओबीसी नेत्यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणूक पुढे ढकलाव्यात अशी भूमिका घेतली आहे. भाजपसह महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांचे निवडणूक न घेण्यावर एकमत झाले होते.
मात्र अशातच सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता 23 सप्टेंबर 2021 रोजी पार पडणार आहे.
याबाबत आता ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली असून आता कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्याव्याच लागतील असं मत मांडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्टपणे सांगितलं होतं की, जोपर्यंत औपचारिकता पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. मात्र, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही एक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शरद पवार यांच्या लीडरशिपमधील लोक म्हणजे छगन भुजबळ असतील, त्यांचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांनी एक फंडा वापरला की आम्ही दिल्लीला चाललो आहोत. आम्ही हे आरक्षण वाचवू शकतो. परंतू ते हे विसरले की ही लढाई पैशाविरुद्धची आहे, आरक्षणाच्या टक्केवारी विरोधातली आहे. ही लढाई संविधानिक आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं.
यासोबतच, हे पॉलिसी बेस आरक्षण आहे. केवळ इच्छाशक्ती नाही म्हणून त्यांना हे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार, शरद पवार, त्यांनी केलेली कुचराई जबाबदार आहे, असा आरोप देखील त्यांनी केलाय. तर, आता निवडणुका घेणं किंवा न घेणं हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाच्या हातात आहे. निवडणुका या घ्याव्याच लागतील आणि नाही घेतल्या तर तो न्यायालयाच्या आदेशाचा भंग ठरेल. जो कुणी कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट करेल त्याला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय झापेल, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘धनुभाऊ, माध्यमांना ब्लॉक करून काय होणार? परिस्थितीला सामोरे तर जावेच लागेल ना!’
- ‘काँग्रेस आता पक्ष राहिला नाही; बहुतेक जण सत्ता मिळतेय म्हणून सहन करा हेच म्हणतायत’
- ‘शिवसेनेतील नेत्यांकडूनच मुख्यमंत्री ठाकरेंची दिशाभूल’, मुनगंटीवार यांची टीका
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
