नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद थांबवण्याचे नाव घेत नाही. अँटिलिया स्फोटक व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेने दिशाभूल केली असल्याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या खुलाशावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरणात एक-एक करून ट्विस्ट येत आहेत. यातील पोलिस अधिकारी सचिन वाझे हा मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करीत आहे. चौकशीत या गोष्टीचा खुलासा झाला आहे आणि ही गोष्ट समजायला मुख्यमंत्र्यांना तब्बल सहा महिने लागले, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. राज्यातील काही अधिकारी व शिवसेनेतीलच काही नेते आजही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले, ‘एवढी साधी गोष्ट समजण्यासाठी मुख्यमंत्र्यांना एवढा प्रदीर्घ कालावधी लागला हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. विधानसभेत वाझे हे ओसामा बिन लादेन आहे का, असे म्हणत त्याचा बचाव करण्यात आला होता अशी आठवण त्यांनी करून दिली. ९ मार्चला अधिवेशनात आम्ही वारंवार मागणी करत होतो. या ठिकाणी मोठे कारस्थान सुरू आहे, असे सतत सांगत होतो. पण मुख्यमंत्री काही ऐकायला तयार नव्हते. ही दिशाभूल मुख्यमंत्र्यांना समजेल त्यावेळेस महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असेल, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरवेळेस आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी कधी तरी हळहळ व्यक्त करा’, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
- ‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’
- साकीनाका घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, सुमोटो दाखल करत पोलिसांना लिहिले पत्र
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- ‘काहीतरी करायचंय म्हणून कार्यालय हलवू नका’, भुजबळांचा मंत्री कराडांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

