बुलढाणा : केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून वाढलेल्या तेलाच्या किंमती काहीशा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ४ ते ५ रुपयांनी खाद्यतेल कमी होणार असलं तरी यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार असल्याचं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नमूद केलं आहे.
रविकांत तुपकर म्हणतात, ‘केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हादरा दिला आहे. पामतेलावरील आयात शुल्क १० वरून थेट २.५%,तर सोयाबीन,सूर्यफूलाचे शुल्क ७.५ वरून २.५ टक्क्यांवर आणले आहे.त्यामुळे सूर्यफूल व सोयाबीन तेल प्रति किलो चार रुपयांपर्यंत स्वस्त होतील.’
मात्र ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे सोयाबीनच्या भाव मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. केंद्र सरकार सातत्याने शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. केंद्राचे कृषीविषयक धोरण देशातील शेतकऱ्यांना पूरक नसून मारक आहे. त्यात तातडीने बदल करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गुन्हेगार सरकारचे जावई झालेत; साकीनाका प्रकरणावरुन नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका
- ‘काँग्रेस आता पक्ष राहिला नाही; बहुतेक जण सत्ता मिळतेय म्हणून सहन करा हेच म्हणतायत’
- आरोपीच्या शिक्षेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरात लवकर पाऊल उचलतील याचा विश्वास – राऊत
- उजळ माथ्याने मेळावे घेणाऱ्या महेबूब शेखवरही गुन्हा दाखल करा, भाजप महिला मोर्चाची मागणी
- पाणी द्या, नाहीतर टाकीवरुन उडी मारणार; भाजप नगरसेवकाचं ‘शोले स्टाईल’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

