मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून सर्वाधिक आमदार असून देखील ऐनवेळी शिवसेनेशी युती तुटल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने हल्लाबोल केला आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असा दावा करण्यासोबतच मंत्र्यांनी घोटाळा केल्याचे आरोप भाजपकडून सातत्याने केले जात आहेत. तर, शिवसेनेनं साथ सोडल्याची सल देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील कमालीचा संघर्ष वाढला असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. ‘पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंच्या शिवसंग्राम, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश होतो. याशिवाय आणखी काही छोटे पक्ष सोबत आहेत. मात्र काही जणांची स्थिती नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी आहे. ५६ आमदार असताना ते मुख्यमंत्री झाले आहेत,’ असा खोचक टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आमच्या नगराध्यक्षांच्या नीच कृत्याला पक्षाचे समर्थन नाहीच’, बीडच्या ‘त्या’ प्रकरणावर चित्रा वाघ यांचा खुलासा
- ‘भावोजी तुम्ही मागच्या दाराने दर्शनाचा प्रकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘आदेशा’ने केला का ?’
- ‘आम्ही परंपरा जपतोय; राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा मात्र गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही’
- ‘GDP वाढला म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किंमतीत वाढ’, राहुल गांधींचा मोदींना टोला
- ‘एकाला ईडीची नोटीस आली कि लॉकडाऊन, हे चालणार नाही; वसूली सोडून दुसरीकडेही लक्ष द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

