Share

‘आमच्या नगराध्यक्षांच्या नीच कृत्याला पक्षाचे समर्थन नाहीच’, बीडच्या ‘त्या’ प्रकरणावर चित्रा वाघ यांचा खुलासा

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यात एक खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय तरुणीची सोनोग्राफी करण्याचा बहाणा करत थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये नेऊन डॉक्टरने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्याविरुद्ध धारूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकारने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली आहे. ‘नगराध्यक्ष आमचा असला तरी नीच कृत्यामध्ये पक्ष कधीही समर्थन देणार नाही’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, या प्रकरणात बीड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. याची चौकशी करतं सत्य समोर आणावे. दोषी असेल तर कारवाई व्हावी, शिक्षा व्हावी. नगराध्यक्ष भाजपचा जरी असला तरी असल्या नीच कृत्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधीही समर्थन देण्याचा प्रश्नचं उद्भवत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?
डॉ. स्वरूपसिंह हजारी हे धारूर नगर पालिकेत भाजपचे नगराध्यक्ष आहेत. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच खासगी दवाखाना चालवतात. मंगळवारी दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली. तिला सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहोचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

खोटा गुन्हा तत्काळ मागे घेण्याची मागणी
दरम्यान, स्थानिक डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनकडून हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. या गुन्ह्याविरोधात आज बुधवारी असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद पुकारला आहे. तसेच हजारी यांच्या समर्थनाथ डॉक्टर संघटना आणि हजारी यांचे समर्थक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करावी, अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे. या प्रकरणात आरोपी डॉक्टर स्वरूपसिंह हजारी फरार आहेत सध्या धारूर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!