Share

‘भावोजी तुम्ही मागच्या दाराने दर्शनाचा प्रकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘आदेशा’ने केला का ?’

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलनाची घोषणा केलीये.

एकीकडे सामान्यांसाठी मंदिरे खुली करावे यासाठी आंदोलन सुरु असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे मात्र नियम धुडकावून मंदिरात अभिषेक करत असल्याचे समोर आले होते. आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी देखील मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे फुटेज समोर आले आहे. यामुळे देवाच्या दारात देखील आमदार-खासदारांना वेगळा न्याय आणि सामान्यांवर अन्याय होत असल्याचे समोर येत असून यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आता मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनीही या प्रकरणावरुन टीका केली आहे. ‘घंटानाद करा किंवा आणखी कुठला नाद करा, पण आमचा नाद करू नका’ असं म्हणणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे दात त्यांच्याच- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पराक्रमाने- घशात अडकले आहेत. खासदार शेवाळे, सेलिब्रिटी निर्माती एकता कपूर यांसारख्या व्हीआयपींना सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मागच्या दाराने प्रवेश देणारे न्यासाचे अध्यक्ष भावोजी बांदेकर हा प्रकार शिवसेनापक्षप्रमुख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘आदेशा’ने करतात का, याचीही चौकशी व्हायला हवी. लाडक्या भावोजींचं आता काही खरं नाही,’ अशी टीका देखील शिंदे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!