ठाणे : दहीहंडी उत्सवासाठी तसेच मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करून सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यानी कोरोनाच्या विरोधात आंदोलने उभी करावी, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला लगावला होता. तसेच, हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे, असं देखील ठाकरे म्हणाले होते.
आता यावरूनच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. सध्या कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये पुरेश्याप्रमाणामध्ये मोफत लसी उपलब्ध नसल्याची तक्रार केली जातेय. त्यामुळे राजू पाटील यांनी मोफत स्लीकरण शिबीर आयोजित केलं आहे. यासंदर्भात पाटील म्हणाले, ‘आम्ही लसी विकत घेऊन त्या मोफत वाटत आहोत. प्रशासनानेही लसी विकत घेऊन मोफत दिल्या पाहिजेत असं सांगतानाच आम्ही हे करोना संपवण्यासाठी केलेलं एका प्रकारचं आंदोलनच आहे.’
काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला ? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन,हे आता चालणार नाही. pic.twitter.com/daaQDwVdaL
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 1, 2021
याबाबत त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातील कॅप्शनमधून मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक निशाणा साधला आहे. ‘काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला ? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन,हे आता चालणार नाही,’ असा घणाघात राजू पाटील यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आमच्या नगराध्यक्षांच्या नीच कृत्याला पक्षाचे समर्थन नाहीच’, बीडच्या ‘त्या’ प्रकरणावर चित्रा वाघ यांचा खुलासा
- ‘भावोजी तुम्ही मागच्या दाराने दर्शनाचा प्रकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘आदेशा’ने केला का ?’
- ‘आम्ही परंपरा जपतोय; राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा मात्र गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही’
- ‘GDP वाढला म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किंमतीत वाढ’, राहुल गांधींचा मोदींना टोला
- ‘राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोर फेरीवाल्याला प्रसाद देणार’ ; अविनाश जाधव आक्रमक


