🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचे निर्बंध झुगारून मनसेसह भाजपने काल विविध ठिकाणी दहीहंडी दहीहंडी उत्सव साजरा करून राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सार्वजनिक उत्सवाना राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा करत भाजप, मनसे आणि गोविंदा पथकांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिले. त्यामुळे पोलिसांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. तर आता भाजपनंतर मनसेनेही मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य करत अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना फटकारले आहे. ‘सर्व जगामध्ये आपण जी परिस्थिती पाहत आहेत. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरी लाट येणार आहे. जर तिसरी लाट आली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा’ असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
वळसे-पाटलांना आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्ही परंपरा पुढे नेत आहोत. दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हे राजकीय अजेंडा आहेत का? आम्ही काही केलं तर तो राजकीय अजेंडाच असतो का? तुम्ही काही करत असाल तर तो राजकीय अजेंडा ठरत नाही का?’ असे सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केले आहेत.
पुढे ते म्हणाले, ‘वळसे-पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याचा सन्मान राखतो. पण त्यांनीही विचार केला पाहिजे. हिंदू म्हणून आमच्याही भावना आहेत. त्या व्यक्त करण्याचा आम्हालाही अधिकार आहे. मोहरम झाला तेव्हाही गृहमंत्र्यांनी भूमिका मांडली पाहिजे होती. तेव्हा कोर्टाचा आधार घेता. आम्हीही लोकांची काळजी घेऊ असं म्हणतानाच राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही,’ असा टोला देखील नांदगावकर यांनी लगावलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रामाची नियत खराब होती जयकुमार गोरेची चांगली आहे’ ; भाजप आमदारचे वादग्रस्त विधान
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘निवडणुकांत शेती करणाऱ्या खासदार हेमा मालिनी शेतकऱ्यांचं समर्थन करताना का दिसत नाहीये?’
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- ‘भाजपा आता रामाच्या चारित्र्याचे ही लिंचिंग करत ; हिंमत असेल तर गोरेंवर कारवाई करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
