Share

‘GDP वाढला म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किंमतीत वाढ’, राहुल गांधींचा मोदींना टोला

Published On: 

नवी दिल्ली : मोदी सरकार भारतातील नागरिकांकडून पैसा काढून घेत आहे. आणि तो ठराविक लोकांना दिला जातोय, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवून सरकार मोठी कमाई केली. तरीही देशाच्या मालमत्तांची विक्री केली जात आहे. त्यामुळे कमाईचा पैसा नक्की जातोय कुठे? असा सवालही यावेळी त्यांनी केला. केंद्र सरकारच्या कारभारवर भाष्य करण्यासाठी आयोजिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा व आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर ४२ टक्क्यांनी व डिझेलचे दर ५५ टक्के इतके प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ रुपये होता. जो आता ७१ रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात वास्तवात ३२ टक्के घट झाली आहे. गॅसच्या किमतीत २६ टक्के घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किमतीत मात्र ११६ टक्के वाढ झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

‘भाजपा सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे. पण आता संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे’, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनं तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!