नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा विजयासह सुरू केला. त्यांनी मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने 6 विकेट्सवर 156 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई इंडियन्सचा संघ 8 विकेटवर 136 धावाच करू शकला.
चेन्नईचाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांसमोर चेन्नईने पॉवरप्लेमध्ये आपल्या चार विकेट गमावल्या. स्कोअर 24 रन होता. यावर अंबाती रायडू जखमी झाला आणि तो पॅव्हेलियनमध्ये होता. एकूणच, चेन्नईसाठी परिस्थिती चांगली नव्हती पण त्यावेळी चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड नाबाद 88 धावा खेळला. आणि या सामन्यात विजयचा शिलेदार ठरला.
या रंजक सामन्यानंतर गायकवाड म्हणाला, ‘अर्थातच, हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम डावांपैकी एक होता. सुरुवातीच्या विकेट पडल्याने संघ दबावाखाली होता. अशा परिस्थितीत, मी विकेटवर राहण्याचा आणि स्कोअर 130, 140 आणि शक्य असल्यास 150 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होतो.
संघ व्यवस्थापनाकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे गायकवाडने सांगितले. तो म्हणाला, ‘जेव्हा तुमच्याकडे माही भाई आणि चेन्नई सुपर किंग्जचे व्यवस्थापन असते, तेव्हा तुम्हाला कशाचाही विचार करण्याची गरज नाही.’ गायकवाड पुढे म्हणाला, श्रीलंका दौरा आणि येथे (यूएई) केलेल्या तयारीने खूप मदत मिळली.’
गायकवाडने रवींद्र जडेजासह पाचव्या विकेटसाठी 81 धावा जोडल्या. जडेजाने 33 चेंडूत 26 धावा केल्या. गायकवाड म्हणाला की, जडेजा क्रीजवर आला होता, म्हणून मी धावा काढण्यासाठी रिस्क घेतली. वाच्या शेवटी गायकवाडला ब्राव्होने साथ दिली, ज्याने फक्त 8 चेंडूत 23 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या:
- धोनी ब्रिगेड समोर टिकू शकला नाही पोलार्ड; मुंबईची यूएई लीगमध्ये खराब सुरुवात
- धोनीच्या कचाट्यातून सुटणं अवघड; मैदानातील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात
- UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना
- ‘अपेक्षेपेक्षा चांगल्या स्कोअरवर नेले’, माहीने ‘या’ दोन शिलेदारांना दिले विजयाचे श्रेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

