Share

धोनी ब्रिगेड समोर टिकू शकला नाही पोलार्ड; मुंबईची यूएई लीगमध्ये खराब सुरुवात

Published On: 

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2021 चा 30 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर CSK ने 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील हा संघ 20 षटकांत 8 गडी बाद 136 धावाच करू शकला.

या सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या जागी किरोन पोलार्ड कर्णधार होता. CSK चा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. हा सामना जिंकल्यानंतर CSK 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मुंबईचा संघ चौथ्या क्रमांकावर कायम आहे. यूएई लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली.

मुंबई इंडियन्सचा डाव, सौरव तिवारीचे अर्धशतक

दीपक चाहरने मुंबई संघाला पहिला धक्का दिला आणि त्याने सलामीवीर फलंदाज दिकाकला 17 धावांवर बाद केले. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या अनमोल प्रीत सिंगने 16 धावा केल्या आणि चहरने त्याला बोल्ड केले. शार्दुल ठाकूरने सूर्यकुमार यादवला 3 धावांवर झेलबाद केले. ब्रावोने ईशान किशनला रैनाच्या हाती 11 धावांवर बाद केले. या सामन्यात कर्णधार असलेला किरोन पोलार्ड 15 धावांवर तर कृणाल पंड्या 4 धावांवर धावबाद झाला. मिलनने 15 आणि राहुल चहार खाते न उघडता बाद झाले. सौरव तिवारीने नाबाद 50 धावांची खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. CSK साठी ब्राव्होने तीन, दीपक चाहरने दोन तर हेझलवूड आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

CSK चा डाव, ऋतुराजची अर्धशतकी खेळी

सीएसकेने मुंबईविरुद्ध खराब सुरुवात केली होती आणि सलामीवीर डु प्लेसिस एकही रन न करता बाद झाला. त्याला बोल्टने बोल्ड केले. चेन्नईला दुसरा धक्का बसला तो मोईन अलीच्या रूपात, जो खाते न उघडता अॅडम मिलनच्या चेंडूवर सौरभ तिवारीच्या हाती झेलबाद झाला.  रायडूला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.

सुरेश रैना तिसऱ्या विकेटच्या रूपात पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याला राहुल चहरने ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर४ धावा केल्यावर झेलबाद केले. संघाची चौथी विकेट कर्णधार धोनीच्या रूपात पडली, जो अवघ्या 3 धावा केल्यावर बाद झाला. CSK ची 5 वी विकेट जडेजाच्या रूपात पडली आणि तो 26 धावांवर बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. ब्राव्होने 8 चेंडूत 23 धावा केल्या तर ऋतुराज गायकवाड 88 धावांवर नाबाद राहिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!