Share

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात

Published On: 

दुबई : इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने काल १९ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा महत्वाच्या दोन संघांच्या टक्करने सुरु झाला. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय प्राप्त केला.

चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार मराठमोळा ऋतुराज गायकवाड ठरला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं या विजयाचं श्रेय नाबाद 88 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला दिलं. अर्थात ऋतुराजनं संकटात असलेल्या संघाला केवळ सावरलंच नाही तर एक आव्हानात्मक धावसंख्याही उभारुन दिली. याच बळावर चेन्नईनं हा सामना जिंकला.

चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत सामन्यात मुंबइ इंडियन्ससमोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सच्या संघाला २० षटकांच्या अखेरीस ८ बाद १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली. धोनी ब्रिगेडनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयसह गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!