नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने काल १९ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा महत्वाच्या दोन संघांच्या टक्करने सुरु झाला. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय प्राप्त केला. या विजयाचे शिलेदार ऋतुराज गायकवाड आणि ब्रावो ठरले. तसेच कर्णधार धोनीने देखील या विजयचे श्रेय ब्रावो आणि ऋतुराजला दिले आहे.
ऋतुराज गायकवाडचे नाबाद अर्धशतक आणि ब्राव्होच्या झंझावाती खेळीसह चेन्नईने आव्हानात्मक धावसंख्या केली. मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळवल्यानंतर धोनी म्हणाला की, ‘या दोन्ही फलंदाजांनी अपेक्षेपेक्षा चांगल्या स्कोअरवर नेले.
चेन्नईच्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्राव्हो (25 धावात 3) आणि दीपक चाहर (19 धावांत दोन बळी) यांच्या धारदार गोलंदाजीसमोर मुंबईचा संघ आठ बाद 136 धावांवर मजल मारू शकला.
या सामन्यानंतर धोनी म्हणाला, ’30 धावांवर चार विकेट गमावल्यानंतर आम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या ठेवायची होती. मला वाटते ऋतुराज आणि ब्राव्होने आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगल्या स्कोअरवर नेले. आम्ही 140 चा विचार केला पण 160 च्या जवळ जाणे विलक्षण होते.
महत्वाच्या बातम्या:
- धोनी ब्रिगेड समोर टिकू शकला नाही पोलार्ड; मुंबईची यूएई लीगमध्ये खराब सुरुवात
- धोनीच्या कचाट्यातून सुटणं अवघड; मैदानातील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात
- UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा


