🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2021 चा 30 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर CSK ने 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील हा संघ 20 षटकांत 8 गडी बाद 136 धावाच करू शकला.
आयपीएल 2021 मधील दुसऱ्या सत्राची सुरुवात रविवारपासून झाली. या सत्रातील पहिला सामना मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. आयपीएलच्या या 30 व्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाला चेन्नईनं 20 धावांनी हरवलं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईच्या संघानं मुंबईसमोर 6 गडी बाद 156 धावा केल्या.
https://twitter.com/CowCorner9/status/1439632620568997890?s=20
यासामन्यात धोनीची चाणाक्ष बुद्धी आणि खेळावर असणारी पकड त्यानं या सामन्यात पुन्हा सिद्ध केलं आहे. धोनीचा डिसीजन रिव्यू सिस्टम चा मास्टर म्हणून त्याचा उल्लेख का केला जातो. या सामन्यात झाले असे की, मुंबईचा संघ जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा तिसऱ्याच षटकात पहिल्या चेंडूवर दीपक चाहरच्या गोलंदाजीवर क्विंटन डिकॉक गोंधळला दिसला. आणि चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला. पण, मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायरनं त्याला नाबाद घोषित केलं. त्याचवेळी माहीनं लगेचच या निर्णयासाठी रिव्ह्यूचं अपिल केलं. ज्यानंतर थर्ड अंपायरनं डिकॉकला बाद घोषित केलं आणि पुन्हा एकदा धोनीनं डिसीजन रिव्यू सिस्टम बाबतचा आपला अंदाज आणि खेळातील निरिक्ष ण किती अचूक आहे, हे स्पष्ट केलं. मैदानातील धोनीचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धोनी ब्रिगेड समोर टिकू शकला नाही पोलार्ड; मुंबईची यूएई लीगमध्ये खराब सुरुवात
- विराटचा मोठा निर्णय! आयपीएल 2021 नंतर सोडणार आरसीबीचेही कर्णधारपद
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात
- UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
