Share

UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना

Published On: 

दुबई : इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने काल १९ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2021 चा 30 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर CSK ने 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील हा संघ 20 षटकांत 8 गडी बाद 136 धावाच करू शकला. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय प्राप्त केला.

मुंबईचा यूएईमध्ये खराब रेकॉर्ड

कोरोनामुळे आयपीएलचा दुसरा टप्पा सयुंक्त अरब अमिरातममध्ये आयोजीत करण्यात आला. आयपीएल भारताबाहेर खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धा दक्षिण अफ्रीकेत खेळवण्यात आली होती. तर 2014 मध्ये सुरुवातीचे सामने यूएई मध्ये खेळवण्यता आले होते. आयपीएल 2020 चा पूर्ण सीजन यूएई मधील दुबई, अबू धाबी आणि शारजाह शहरात होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा  आतापर्यंतचा यूएईमधला रेकॉर्ड पहिला तर संघ येथे पाच सामने खेळला आहे आणि या पाचही सामन्यात मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघाच्या कामगिरीला घेऊन चिंतीत नाही. जुन्या संघातील फक्त दोनच खेळाडू संघात खेळत असल्याचे रोहितने सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!