Share

शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांना शिस्त लागणार कधी? बेशीस्त वाहनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा

Published On: 

औरंगाबाद : शहरातील महत्वाच्या शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर नेहमीच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. याला जबाबदार जितके प्रशासन आहे तितकेची येथे प्रवास करणारे वाहनधारकही जबाबदार आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनांना शिस्त लागावी यासाठी पांढरे पट्टे आखले. पण बेशीस्त वाहनधारकांना शिस्त पाळायची नसल्यामुळे येथील वाहतूक कोंडी प्रश्न सुटणे शक्य नाही.

मुख्य शहरातुन बीड बायपासकडे जाणाऱ्या शिवाजीनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचाच भाग आहे. पण दिवसेंदिवस येथील वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे ही आणखीणच जटिल बनली आहे. यावर उपाय म्हणून काही दिवसापुर्वी वाहतूक पोलिसांनी या क्रॉसिंगवर पांढरे पट्टे आखले व रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावले. मात्र तरीही गेट उघडताच दोन्हीकडील वाहनचालक कोणतीही शिस्त न पाळता घुसकोरी करत असल्याने आढळून येते. त्यामुळे उपाययोजना करुनही या ठिकाणी बेशिस्त वाहनधारकामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

पोलिस आयुक्तांनी स्वत: लक्ष दिले व आदेश दिले. यानंतर सोमवारी वाहतूक पोलिस शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख व सहकाऱ्यांनी शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर सकाळी ११ ते १२ दरम्यान पाहणी करून वाहतुकीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच बॅरिकेड्सही लावले. आता वाहनधारकांनी शिस्त पाळावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. पण बेशिस्त वाहन किती शिस्त पाळतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र परिसरातील नागरिंकाच्या मतानुसार जोपर्यंत भुयारी मार्ग होत नाही तोपर्यंत येथील वाहतुकीची समस्या सुटण्याची शक्यता कमीच आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!