Share

मराठवाड्यातील पाणी तेलंगाणात; बाभळी बंधाऱ्यातील ०.६ टीएमसी पाणी तेलंगाणात

Published On: 

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मराठवाड्यातील धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील बाभळी बंधाऱ्यात जमा झालेल्या पाणीसाठ्यातील ०.६ टीएमसी पाणी सोमवारी त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत तेलंगणात सोडण्यात आले. धर्माबाद येथील बाभळी बंधाऱ्याची पाणीपातळी ३३४.२० मीटर आहे. म्हणजे २८.०९ दशलक्ष घनमीटर, ०.९९ टीएमसी जलसाठा आहे. या एकूण जल साठ्यातील ०.६ टीएमसी पाणी सोमवारी सोडण्यात आले आहे, बधांऱ्यात ०.३९ टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे.

यामुळे बाभळी बंधाऱ्यातील एक टीएमसी पाण्यातून जवळजवळ साठ टक्के पाणी जाणार आहे. तर बंधाऱ्याची पाणीपातळी तीन मीटरने खाली जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनिल पडवळ यांनी सांगितली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे एक जुलै रोजी बाभळी बंधाऱ्याचे सर्व १४ गेट वर उचलले जात असतात, तर २९ ऑक्टोबर रोजी सर्व १४ गेट खाली सोडले जातात. तेलंगणातील पोचमपाड (श्रीराम सागर)धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बाभळी बंधारा असल्याने त्या पाणीसाठ्यातील एक मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले.

या प्रसंगी मराठवाड्यातील कार्यकारी अभियंता एन. श्रीनिवासराव, कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे हे उपस्थीत होते. तर तेलंगण राज्यातील श्रीराम सागर (पोचमपाड) चे कार्यकारी अभियंता एन. व्यंकटेशराव , सचिन देवकांबळे, एस. पी. शिंदे, आर.के. मुक्कावार, गुंडेवार एल.व्ही., पांडे डी.एल. व नागोराव पा. रोषणगावकर, सुनीता पा. बाभळीकर, माहिती अधिकार तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील येताळे, स.पोलिस निरीक्षक कत्ते, बालाजी बोडके उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!