🕒 1 min read
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे ४२ दिवसांपासून महिला, मुली, तरूण नागरिक ठिय्या आंदोलन करत आहेत. आता येत्या ७ मार्चला या आंदोलकांनी राज्यव्यापी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चा राज्यभरातून मराठा समाजातीन नागरिक सहभागी होणार आहे. यादृष्टीने राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन या मेळाव्याचे नियोजन केले जात आहे.
शिव संवाद अभियानातून जनजागृती
साष्टपिंपळगाव येथे ७ मार्चला होणाऱ्या विराट आरक्षण आक्रोश मेळाव्याची पूर्वतयारी सुरू आहे. सध्या राज्यांतील विविध गावांत शिव संवाद अभियानातून याची जनजागृती चालू आहे. जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्वच जिल्हा परिषद सर्कलमध्ये सोमवारी मराठा आरक्षणासाठी बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मोर्च्यात हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे तरुण धडकणार
आक्रोश मोर्च्यात हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे तरुण धडकणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या मेळाव्याबाबत धास्ती घेतली आहे. आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज एकवटला असून शेकडो जण पायी, रॅली,भव्य मोटारसायकल रॅली, चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह ट्रॅक्टर, बैलगाड्या घेऊन हजारो जण ७ मार्चला या साष्टपिंपळगावात येणार आहे. हलाखीचे जीवन जगत असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, या मेळाव्याबाबत सरकारने घाट घातल्यास समाज बांधवांतून असंतोष निर्माण होईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
