🕒 1 min read
औरंगाबाद : मराठवाड्यात सोमवारी ६४७ नवे रुग्ण आढळल, ८ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण ५२३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या ५१३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये २२५, जालना १७८, परभणी २८, हिंगोली २४, नांदेड ९०, लातूर ४१, उस्मानाबाद ९, बीडमध्ये ५२ नवे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादमध्ये ३, नांदेड व लातूरमध्ये प्रत्येकी २ व परभणीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
औरंगाबादेत कोरोनाचे २२५ रुग्ण, तिघांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे २२५ रुग्ण आढळले, तर तिघांचा मृत्यू झाला. आता एकूण रुग्णांची संख्या ५०,५९१ झाली आहे. मनपा आणि ग्रामीण भागातील १३० जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४७,१२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या २,१९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बळींचा आकडा १२७१ वर पोहोचला आहे. दरम्यान, घाटीत गंगापूर तालुक्यातील पळसगावातील ४५ वर्षीय पुरुष, सावंगीतील ७० वर्षीय महिला आणि खासगी रुग्णालयात नागेश्वरवाडीतील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
हिंगोलीत ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर
रुग्ण वाढत असल्याने हिंगोली जिल्ह्यात १ ते ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. हिंगोली आगारातून जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या. हिंगोली बसस्थानकात प्रवाशांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात आहे. सोमवारी ४ प्रवासी पॉझिटिव्ह आढळले.
जालना जिल्ह्यात १७८ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
जालना जिल्ह्यात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी १७८ नवे बाधित आढळून आले. यामुळे बाधितांची एकूण संख्या १५ हजार ५८४ एवढी झाली. दिवसभरात १३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १४ हजार ३४२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
