🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जितका तो आपल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे, तितका तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. फलंदाजीत विराट कोहलीचे अनेक विक्रम आहेत, परंतु आता कोहलीवर त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे. इंस्टाग्रामवर कोहलीचे 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट हा इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा पहिला भारतीय आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता जगभर आहे. आपल्या खेळण्याचा अंदाज, खेळातलं सातत्य यासह तो आपल्या स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असतो. मैदानावर त्यानं आजवर अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. मैदानातील विक्रमांसह आता त्यानं सोशल मीडियावर देखील एक नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. विराट कोहलीच्या या यशाबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) देखील शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो. तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो.
Virat Kohli – the first cricket star to hit 100 million followers on Instagram ???? pic.twitter.com/HI1hTSbo8M
— ICC (@ICC) March 1, 2021
विराट कोहली हा जगातला एकमेव क्रिकेटर आहे ज्याचे इंस्टावर 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराटसह द रॉक ड्वेन जॉनसन, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार, लियोनेल मेसी या क्लबमध्ये आहे. सोबतच सेलिब्रिटींमध्ये बेयॉन्से आणि एरियाना ग्रॅंड या क्लबमध्ये आहेत. खेळाडूंच्या यादीमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो नंबर एक वर अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी दुसर्या क्रमांकावर आणि ब्राझीलचा नेमार तिसर्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

