🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून स्वत:चे कर्तव्य बजावणाऱ्या औरंगाबाद घाटी येथील कत्रांटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अधिच तुटपुंजे वेतन तेही वेळेवर मिळत नसल्याने मागील ११० दिवसापासून कत्रांटी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. वेळेवर न मिळणाऱ्या वेतनामुळे कर्मचाऱ्यात अंसतोष पसरला आहे.
घाटीतील कत्रांटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत करावे अशी मागणी घेऊन महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकने पुढाकार घेतला आहे. घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या कत्रांटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडले. या कोरोना योद्धांनी दिवस-रात्र रुग्णांची सेवा केली. तरीही कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजे वेतन मिळते आहे. त्यातही फेब्रुवारी महिना संपला असून जानेवारीचे वेतन मिळाले नाही. कत्रांटी कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
सदर कत्रांटी कर्मचारी ११० दिवसांपासून अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्या दालनासमोर उपोषणावर आहेत. येत्या दोन दिवसांत जर पगार आणि बोनस मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर अभय टाकसाळ, विकास गायकवाड, किरण पंडित, भालचंद्र चौधरी, गजानन खंदारे व इतर कत्रांटी कर्मचारी आदींच्या साह्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- देशाची अर्थव्यवस्था रुळावर; जीएसटी संकलनात ७ टक्क्यांची वाढ
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- मराठवाड्यातील पाणी तेलंगाणात; बाभळी बंधाऱ्यातील ०.६ टीएमसी पाणी तेलंगाणात
- विराट कोहलीच्या नावावर अनोखा विक्रम ; इंस्टाग्रामवर रोकॉर्डतोड फॉलोवर्स
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू


