Share

शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..

Published On: 

अहमदनगर : शिर्डी शहरातील साई मंदिर कधी उघडणार आहे, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे. याबाबत नगरचे खासदार सुजय विखे यांनी भाष्य केले आहे. ‘मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याबाबत महाराष्ट्रातील सरकार निर्णय घेणार असले तरी हे मंदिर लवकरात लवकर उघडले जावे यासाठी पक्षपातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील निवेदन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

‘गेल्या पाच वर्षांत शिर्डीत रोज विश्वस्त मंडळ जाहीर होत आहे. त्याबाबत याद्याही जाहीर होत आहेत. पण महाविकास आघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते विश्वस्त मंडळ जाहीर करतील’, अशी प्रतिक्रिया विखे यांनी दिली. कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानवर लवकरच विश्वस्त मंडळ येणार, अशी चर्चा जोरदारपणे सुरू आहे. याबरोबरच या विश्वस्त मंडळात कोणाची वर्णी लागणार, कोण अध्यक्ष होणार, यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या पार्श्वभुमीवर खासदार विखे बोलत होते.

मंदिर उघडण्यापूर्वी शिर्डीमध्ये लसीकरणावर भर
मंदिर उघडण्याच्या अगोदर शिर्डी शहरातील प्रत्येक घरातील ४५ वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला एक डोसतरी देण्यात आला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. लसीकरणासाठी लोकांना येण्या-जाण्यासाठी अडचणी येत होत्या, त्या दूर करण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून वाढणे हाच लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय झालेला असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल, यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!