नांदेड : आपला मतदारसंघ अबाधित ठेऊन दुसऱ्याच्या मतदारसंघाला दुर्लक्षित करणारे नेते होऊ शकत नाही. फक्त भोकर मतदारसंघाला १०० टक्के पीक विमा मिळतो तर इतर मतदारसंघांना का मिळत नाही, पालकमंत्र्यांनी मतदारसंघापुरते मर्यादित न राहता काम केले तर जनहित होईल, असा टोला भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लगावला.
खा.चिखलीकर यांचा किनवट नगर परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खा.चिखलीकर यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘त्यांना विकासकामे करण्यासाठी किनवट दिसत नाही तर निवडणुकी पुरते ते किनवटकडे लक्ष देतात. कारण लातूर जिल्ह्यात २३ विविध विभागीय कार्यालये आहेत तर नांदेड जिल्ह्यात फक्त तीन ठिकाणी विभागीय कार्यालय आहे तर किनवट हा तालुका १५० किमी अंतरावर असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले’.
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता खा.चिखलीकर म्हणाले की, नियोजित आराखड्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे काम होत नाही. किनवट शहरातच कसा ईको झोन लागतो, इको झोनच्या नावाखाली शहरातच १८ मीटर रुंद रस्ता होत आहे. याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन चौकशी करण्यास भाग पाडू असे चिखलीकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
