लातूर : आगामी नगरपंचायती, नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका राज्यातील महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. यासंदर्भात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कार्यक्रम ठरवणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत शिवसेना कार्यकर्ते, नेते व राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे काम केले. आता कोरोनाला रोखण्यात यश येत असून, लॉकडाऊन मागे घेतल्याने शिवसेनेने मराठवाडा दौऱ्याचे नियोजन केले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यातील ५ नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने या निवडणुकांची तयारी सुरू केली असून, पुढच्या वर्षी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकांची तयारी करण्यासाठी हा जनजागृती अभियान दौरा कार्यक्रम शिवसेनेने सुरू केला आहे.
काँग्रेस सोबत आल्यास ठीक, नाही तर स्वतंत्र लढू
आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत, नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल, असा विश्वास आहे; पण काँग्रेस पक्ष सोबत आला तर ठीक. नाही तर शिवसेना स्वतंत्र निवडणुका लढविण्यास तयार आहे. कारण, काँग्रेस पक्षाची अलिकडची मतमतांतरे पाहता त्यांची काय भूमिका राहील, असे आम्हाला सांगता येणार नाही. ते वरूनच ठरेल. त्यानुसार आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ, असे शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा


