बीड : वारकरी संप्रदायात सुमारे सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील संतश्रेष्ठ वामणभाऊ यांच्या पादुका वारीला राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. पंकजा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाही. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा व वारीच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये अशी मागणी पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा व वारीच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये अशी मागणी @CMOMaharashtra कडे पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/PFtJOwPUpF
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 17, 2021
गहिनीनाथ गडाच्या पालखीला मानाचे स्थान
पाटोदा तालुक्यात श्री क्षेत्र गहिनीनाथ गड हे पुरातन संस्थान आहे. येथे वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या संतश्रेष्ठ वामणभाऊ यांच्या पादुका आहेत. सुमारे सव्वाशे वर्षापासुन येथील पादुका पायी दिंडीने आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाला जातात. विशेष म्हणजे गहिनीनाथ गडाच्या पालखीला मानाचे स्थान आहे आणि अगदी सुरूवातीपासूनच पन्नास हजार वारकरी सहभागी होणारी ही पालखी आहे.
गेल्या वर्षी पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला
यावर्षी वारकऱ्यांना कोरोनामुळे आषाढी वारीला जाता येणार नाही. मात्र तरीही मानाच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला घेऊन जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गहिनीनाथ गडावरील पादुकाही मानाच्या आहेत आणि या पालखीला तब्बल १२५ वर्षाची परंपरा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, डीएपी खतांच्या अनुदानात आणखी वाढ
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा
- ‘पदोन्नती आरक्षणावर महाराष्ट्र ढवळून काढणार’, ऊर्जामंत्री राऊत यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

