Share

गोव्यातील लॉकडाऊन कधी उठणार? जाणून घ्या मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले..

Published On: 

पणजी : देशातील इतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आहेच. त्यात इतर आज्यांमधून गोव्याला पर्यटक आल्यामुळे गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा राज्यात जोपर्यंत सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यातील पर्यटन व्यवसाय संपूर्ण बंद असणार आहे असे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

सध्या मान्सूनचा काळ असल्यामुळे किनारपट्टी भागातील राज्यांसाठी हा पर्यटनाचा काळ नाहीये. त्यामुळे पर्यटकांची संख्याही कमी असेल. म्हणून लसीकरणानंतरच संपूर्ण गोव्यातील पर्यटन व्यवसाय सुरु करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.

या आधी गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनीही पर्यटन व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. “किनारपट्टीवरील संपूर्ण लोकांचे पूर्णपणे लसीकरण केल्यावरच पर्यटन पुन्हा सुरू झाले पाहिजे. गोव्याचे पर्यटन उद्योग आम्ही कायमच बंद ठेवू शकत नाही कारण ते आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण कणा आहे,” असे अजगावकर म्हणाले.

व्यावसायिकांकडून बंदी उठवण्याची मागणी
गोव्यात करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. गोव्यात पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. लॉकडाउनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!