🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास या दिवशी सात महिने पूर्ण होत आहेत. या निमित्त ही निदर्शने केली जात आहेत.
केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारशी अनेक फेऱ्या झाल्यानंतरही यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. कोरोना संकटामुळे शेतकरी आंदोलनावर परिणाम झालेला पाहायला मिळाला. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला चालना देण्यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार असल्याची घोषणा टिकैत यांनी केली आहे.
26 जून लोकतंत्र बचाओ, किसान बचाओ दिवस
कृषि कानूनों के विरोध में देशभर के सभी राजभवन का घेराव कर ज्ञापन देंगे किसान#FarmersProtest #जुमला_नहीं_MSP_कानून_दो @meelrajaram @sakshijoshii @ABPNews @TezChannel @news24tvchannel @OfficialBKU @Kisanektamorcha pic.twitter.com/jRzEX170Gl— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) June 17, 2021
राकेश टिकैत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ‘२६ जून रोजी लोकशाही वाचावा, शेतकरी वाचवा दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच मीडियाशी बोलताना टिकैत म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला आता सात महिने होतील. यामुळे राष्ट्रपतींनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तसेच २६ जून रोजी शेतकरी देशभरातील सर्व राजभवनांना घेराव घालतील. जल, जंगल आणि जमीन वाचवायची असेल, तर चोरांविरोधात लढाई, संघर्ष करावा लागेल, असे टिकैत यांनी सांगितले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन
शेतकरी २६ जून रोजी विरोध प्रदर्शनावेळी विविध राज्यांमधील राज्यभवनाबाहेर निदर्शने करतील व काळे झेंडे दाखवतील. तर, संयुक्त किसान मोर्चा प्रत्येक राज्याच्या राज्यपालाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठवेल. तसेच, हा दिवस शेती वाचवा, लोकशाही वाचवा दिवस म्हणून देखील पाळला जाणार असल्याचं ऑल इंडिया किसान सभेचे इंद्रजित सिंग यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- ‘अशोक चव्हाणांनी जनहिताचे कामे करावीत’, खा.चिखलीकरांचा टोला
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
