मुंबई – कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकास आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला होता. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडी शिवाय होणारं हे दुसरं अधिवेशन ठरले आहे.अध्यक्षांची निवड व्हावी यासाठी विरोधी पक्षातील भाजपसह सत्ताधारी पक्षातील काँग्रेसही आग्रही होती. मात्र या अधिवेशनात देखील विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही.
महाविकास आघाडीत सध्या शीतयुद्ध सुरू आहे. कॉंग्रेस उमेदवार कोण देणार यावर देखील मते फुटणार की नाही याचे भवितव्य अवलंबून होते. काँग्रेसच्या ज्या दोन उमेदवारांची नावं चर्चेत होती त्यांना राष्ट्रवादीचे नेते पाठींबा देतील की नाही याबाबत देखील साशंकता होती या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर दोन दिवस चाललेल्या अधिवेशनात तरी मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा अध्यक्ष द्यायला हरकत नव्हती पण मतदान मात्र ओपन बॅलेटने हवे होते. नियमानुसार ते मात्र गुप्तपणे घ्यावे लागणार हे लक्षात आल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत ह्यावर तिन्ही पक्षांमध्ये बरीच चर्चा होऊन ही निवडणूक पुढे ढकलली असल्याचे कळतंय.
अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया विधीमंडळ अधिवेशन सुरु असतानाच घ्यावी लागते. गुप्त मतदानानीच निवडणूक हा नियम असून आमदारांच्या निलंबनामुळे ती थांबू शकत नाही असे सांगितले जाते. सदनात असणाऱ्या आमदारांनाच मतदान करता येते. आणि आता भाजपचे १२ आमदार देखील निलंबित झाल्याने आता ही निवडणूक ही थेट हिवाळी अधिवेशनातच घेतली जाणर असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?
- ‘बेबो तू आता म्हातारी झालीस’; करीनाची सोशल मीडीयावर उडवली खिल्ली
- अधिवेशन संपले तरीही अडचणी सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या समोर आता नवे आव्हान काय असणार ?


