Share

‘बेबो तू आता म्हातारी झालीस’; करीनाची सोशल मीडीयावर उडवली खिल्ली

Published On: 

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री करिना कपूरने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. करीनाच्या सुंदरतेने आणि अदाने अनेकांना घायाळ करते आणि तिच्या फॅशन सेन्स देखील अनेकांच्या पसंतीस पडते.

करीना नेहमीच सोशल मीडीयाद्वारे चर्चेत असते. ती तिचे फिटनेसचे फोटो अनेकदा चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसापूर्वी तिने योगा करतानाच फोटो शेअर केला होता. आतंराष्ट्रीय योगा दिनानिमित्त म्हणजेच २१ जूनला करीनानं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत करीना नो मेकअप लुकमध्ये योगा करताना दिसत आहे. मात्र या फोटोमुळे तिला आता सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे.

https://www.instagram.com/p/CQYLCVvpFYn/?utm_source=ig_web_copy_link

‘दोन मुलांना जन्म दिल्यानंतर आणि आता प्रसूतीच्या चार महिन्यांनंतर मी खूप थकले होते. पुन्हा सर्व सुरु करताना खूप त्रास होतोय. पण आज मी पुन्हा एकदा हळूहळू सुरुवात करत आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन तिनं या फोटोला दिलं होतं. यावर अनेकानी कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. एक युजरने या फोटोवर कमेंट केली की, तू एवढी जाड झाल्या सारखी का दिसतेस बेबो? बेबो तू आता म्हतारी झालीस. असे एक अनेक कमेंट युजर्सने केल्या आहेत.

करिना बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करिना नेहमीच स्वतःला फिट ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आली आहे. नुकतीच आई झालेली करिना तिच्या वजनाच्या बाबतीत मुळीच हयगय करत नाही. सध्या जिम बंद असल्या तरीदेखील करिनाला काहीही फरक पडलेला नाही. तिने व्यायामाच्या वेळापत्रकात मुळीच बदल केलेला नाही. करीना आता पुन्हा एकदा फिट दिसण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!