Share

‘जय भीम’ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?; राऊतांचा रोखठोक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपल्या सामना रोखठोकमधून या चित्रपटाविषयी भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’जय भीम’ चित्रपटाच्या पडद्यावर हे जळजळीत वास्तव मला दिसले. एका चंद्रू वकिलाने सत्य आणि कायद्याची ताकद दाखवली, पण फादर स्टॅन स्वामी तुरुंगात मारले गेले. सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखांसारखे अनेक चंद्रू तुरुंगात खितपत पडले आहेत. ‘जय भीम’ कोणाला म्हणावे?स्वातंत्र्याचा सूर्य कसा उगवतो? त्या सूर्याची किरणे देशातील असंख्य दलित, आदिवासींपर्यंत पोहोचलीच नाहीत. ‘जय भीम’ हा चित्रपट तामीळसह पाच भाषांतून पडद्यावर झळकला आहे. त्यात स्वातंत्र्याची किरणे न पाहिलेल्या वर्गाची सत्यकथा आहे. ‘जय भीम’मधील सत्यकथन इतके प्रभावी आहे की, तो कोणत्याही भाषेत असला तरी हिंदुस्थानातील शोषित-पीडितांची ती खरी कहाणी आहे.

‘जय भीम’ चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पाहून मी स्वतः सुन्न झालो. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही देशातील आदिवासी, दलित, पीडितांना काय मिळाले? या लोकांच्या डोक्यावर हक्काचे छत नाही. आजही त्यातील अनेकांना कायमस्वरूपी पत्ता नाही. त्यामुळे रेशनकार्ड नाही. जंगलात राहणाऱया या लोकांना मत देण्याचा अधिकार नाही किंवा त्यांची मते दुसरेच कुणीतरी आधीच टाकून मोकळे होतात. ही आपली लोकशाही! ‘आदिवासींना शिक्षण आणि मत टाकण्याचा अधिकार कशासाठी हवा? त्यांना भीकच मागायची आहे. प्रौढ शिक्षणासारखे उपक्रम बेकार आहेत. ते बंद करा. हे लोक जास्त शिकले तर जास्त बकवास करतील, प्रश्न विचारतील’, हा ‘जय भीम’ चित्रपटातील संवाद एका भीषण वास्तवाची जळजळीत जाणीव करून देणारा आहे. ‘जय भीम’ चित्रपटाच्या पडद्यावर एका सत्यकथेचा विद्रोह घडताना पाहणे रोमांचक आहे. ‘सत्यमेव जयते’चा खरा अर्थ या चित्रपटाच्या शेवटी समजतो. ‘जय भीम’ म्हणजे काय, तर कायद्याचा विजय! तो आजही होतोच असे नाही. त्यासाठी अंतापर्यंत लढण्याची तयारी हवी व लढणारा एक चंद्रू हवा.

चंद्रू हा वकील वामपंथी विचारधारा मानणारा होता. तो लढत राहिला. वामपंथी असणे हा गुन्हा नाही. हे लोक नसतील तर जंगलातील अन्यायाविरुद्ध कोण लढणार? हेच चंद्रू पुढे मद्रास हायकोर्टात न्यायाधीश झाले, पण तरुण वकील असताना त्यांच्या एका याचिकेने संपूर्ण राज्यव्यवस्थाच हादरून गेली. राजकन्नूच्या मानवी हक्कांचा लढा ते लढले. राजकन्नू आणि सेनगाई दांपत्याची मनं सुन्न करणारी ही कथा. आजही असे असंख्य राजकन्नू मारले जात आहेत व ‘चंद्रू’ बनून लढणारे फादर स्टॅन स्वामी, सुधा भारद्वाज लढता लढता शहीद होत आहेत. सुधा भारद्वाज गेल्या तीन वर्षांपासून भायखळा तुरुंगात आहेत. त्यांना जामीनही नाकारला जातोय. न्याय मागू नका, न्याय मागणाऱयांसाठी लढू नका हाच त्यामागचा संदेश! सिनेमातला एक प्रसंग देतो व विषय संपवतो.

दरम्यान, लेखाच्या शेवटी ‘जय भीम’ची ही ताकद आहे. काही लोकांना ‘जय भीम’ म्हणजे जात व राजकारणाचे डबके वाटत असेल तर तो कायद्याचा अपमान आहे. ‘जय भीम’ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?, असा रोखठोक सवालही राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!