🕒 1 min read
गडचिरोली : शनिवारी(१३ नोव्हें.)जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात पहाटेपासून उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले.
अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काँबॅट ऑपरेशनसंदर्भात सविस्तर माहिती दिली असून यामध्ये २६ पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांचे मोठे नेते ठार झाल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांची चहुबाजूंनी कोंडी केल्याने ते हतबल झाले. तसेच या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- साठ वर्षांत प्रथमच विलीनीकरणाची एसटी कामगारांकडून मागणी- अजित पवार
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा फी मिळणार परतगडचिरोली,धानोरा,
- पायातली ‘कोल्हापुरी’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला
- संजय राऊतांचा ‘आक्रोश मोर्चा’ परवानगीविनाच; पोलिसांकडून कारवाईचे संकेत
- ‘ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
