औरंगाबाद : देशात असलेल्या वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेतृत्व केले आहे. संजय राऊतांच्या नेतृत्वातील हा आक्रोश मोर्चा परवानगी विनाच होता. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाईचे संकेत औरंगाबाद पोलिसांनी दिले आहेत.
शिवसेनेनं काढलेल्या या मोर्चाची परवानगी शिवसेनेनं घेतली नसल्याचे समोर आले आहे. आता मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. ‘मोर्चाला पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करू’, असे औरंगाबादचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांवर या मोर्चाप्रकरणी गुन्हे दाखल होणार हे लवकरच समजेल. मोर्चात हजारों शिवसैनिकांसह औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, मंत्री संदीपान भूमरे उपस्थित होते. ‘महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणं राज्य सरकारच्या हातात नाही, पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाहीत, त्यामुळे दर कमी करणं हे केंद्र सरकारचं काम आहे’, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही’
- ‘दहा बाय दहाच्या खोलीत राहायचो’ विकी कौशलने केला खुलासा
- त्याला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता- अजित पवार
- सैफ अली खानच्या ‘त्या’ वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
- बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना केली शिफारस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

