Share

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा फी मिळणार परत

Published On: 

मिरज : मागील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क आता त्यांना परत मिळणार आहे. शिक्षण मंडळाने एक परिपत्रकामार्फत या संदर्भातील माहिती दिली आहे.

परिपत्रकात म्हंटले आहे की,’महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन २०२१ मधील इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे) रद्द करण्यात आली होती. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा झाल्या नाहीत. परंतु, बोर्डाने परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थांकडून ४०० ते ५०० रुपये फी घेतली होती. ही परीक्षा फी परत मिळावी यासाठी मिरजेतून न्यायालयीन लढा सुरू करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्या. जी एस कुलकर्णी यांनी बोर्डाला दहावी व बारावीचे घेतलेली परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयात वकिली करणारे मिरजेतील वकील पद्मनाभ पिसे यांनी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रतापसिंह चोपदार यांच्या वतीने याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाच्या आदेशामुळे दहावी व बारावी बोर्डाने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क खर्च वजा करुन उर्वरित रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!