कर्जत : काल(१३ नोव्हें.)कर्जत तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी भाष्य केले.
ते म्हणाले की,’गेल्या साठ वर्षांमध्ये कधीही एसटीचा विलीनीकरणाचा प्रश्न उपस्थित केला गेला नाही. कामगारांकडून प्रथमच ही मागणी लावून धरली जात आहे. या साऱ्यामागे भाजप असून ते जाणीवपूर्वक हे आंदोलन घडवत आहेत.’ तसेच विरोधकांच्या या राजकारणामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही पवार यांनी केले.
दरम्यान, यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, दत्ता भरणे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा गुंड, कपिल पाटील, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- देश हितासाठी लस घेणे गरजेचं- राजेश टोपे
- सह्याद्री अतिथीगृहावरील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया
- पायातली ‘कोल्हापुरी’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला
- संजय राऊतांचा ‘आक्रोश मोर्चा’ परवानगीविनाच; पोलिसांकडून कारवाईचे संकेत
- ‘ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

