Share

रशिया जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ‘अस्पृश्य’ झाला- बायडन प्रशासन

Published On: 

अमेरिका : आज रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा 14 वा दिवस आहे. कीव आणि सुमी यांसह इतर पाच शहरांमध्ये युद्धबंदी करण्यात आली आहे, तरीही रशियाकडून अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, युक्रेनवरील लष्करी कारवाईनंतर रशिया जागतिक अर्थव्यवस्थेसाठी “अस्पृश्य” बनला आहे आणि जागतिक समुदाय मॉस्कोवर कठोर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या पुढाकारात सामील होत असल्याचा दावा अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनाने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाविरुद्ध जाहीर केलेल्या आर्थिक निर्बंध कराराचे वर्णन “इतिहासातील सर्वात महत्त्वाचा” असे केले आहे. तसेच यामुळे रशियन अर्थव्यवस्थेचे खोल नुकसान होईल, असाही दावा करण्यात आला आहे.

रशियाकडून होणाऱ्या तेल आणि वायू आयातीवर तत्काळ निर्बंध जाहीर केल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना बायडन म्हणाले, “यामुळे रशियन अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. पुतिन यांनी घोषित केलेल्या युद्धानंतर, रूबलचे अवमूल्यन सुमारे 50 टक्के झाले आहे आणि त्याची किंमत एक यूएस सेंटपेक्षा कमी झाली आहे.

यावेळी बायडन असेही म्हणाले कि, “आम्ही रशियाच्या सर्वात मोठ्या बँकांना आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेपासून वेगळे केले आहे, ज्यामुळे उर्वरित जगाशी व्यवसाय करण्याची मॉस्कोची क्षमता कमी झाली आहे.” रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून, बायडन यांनी मंगळवारी घोषणा केली की, अमेरिका रशियाकडून तेल आणि वायूची आयातीवर निर्बंध लावणार आहे. त्याचबरोबर बायडन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “आमच्या ऐतिहासिक समन्वयामुळे रशियाला जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी ‘अस्पृश्य’ बनवले आहे.”
मोठ्या कंपन्यांनी व्यवसाय थांबवला 
मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स, कोका-कोला, पेप्सिको आणि जनरल इलेक्ट्रिक यासारख्या अनेक जागतिक ब्रँड्सनी युक्रेनच्या आक्रमणाला प्रतिसाद म्हणून रशियामधील त्यांचा व्यवसाय तात्पुरता स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मॅकडोनाल्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस केम्पचिन्स्की यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आमच्या तत्त्वांनुसार, आम्ही युक्रेनमधील लोकांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.” तसेच याबाबतीत बर्गर जायंटने सांगितले की ते आम्ही आमचे  850 स्टोअर तात्पुरते बंद करणार आहेत, परंतु रशियातील 62,000 कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे देत राहू. कारण त्यांनी “आमच्या ब्रँडसाठी आपला घाम गाळला आहे.”
महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!