Share

“दाऊदच्या हस्तकाकडून मिळालेल्या पैशातून भाजपचा मोर्चा”, राऊतांचा मोठा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा आज मुंबईतल्या आझाद मैदानातून निघणार आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सर्कल पर्यंत हा मोर्चा असणार आहे. मलिकांचा राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut claim) यांनी मोठा दावा करत भाजपला निशाण्यावर धरले आहे.

“मला असे वाटते की, इकबाल मिरचीच्या खात्यातून भाजपला जे काही १०-२० कोटी मिळाले आहेत. दाऊदच्या हस्तकाकडून त्यासाठीच भाजपचा हा मोर्चा असावा. कारण भाजपचा विरोध हा दाऊदविरोधात आहे. त्यामुळे भाजपला इकबाल मिरचीच्या कंपनीतून मिळालेले १०-२० कोटी यातून सुद्धा भाजपने मोर्चा काढला असावा”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान या मोर्चाला पोलिसांची रीतसर परवानगी असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. थोड्याच वेळात आझाद मैदानातून मोर्चाला सुरुवात होईल. आझाद मैदानात भाजपचे कार्यकर्ते आणि नेते जमायला सुरुवात झाली आहे. गर्दी हळूहळू वाढत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!