Share

“…तेव्हा राणेंना मंत्रिमंडळातून काढलं नाही”, मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी सुनावले

Published On: 

पुणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik resignation) यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आता यासर्व प्रकरणावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी भाजपला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा दाखला दिला आहे.

“नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली २० वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार समजलं जातं. कारण नसताना आरोप केले जातात. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जात आहे.”, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

तसेच “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. म्हणजे एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे. त्यामुळे उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील”,असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!