मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Criticism of Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि फोन टॅपिंग प्रकरणावरून भाजपला आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना चांगलेच निशाण्यावर धरले आहे. राज्यपाल सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान राज्यपालांना पदावरून हटवलं पाहिजे का, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “असं सरकारचं म्हणणं नाही तर महाराष्ट्राचं म्हणणं आहे. सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत. त्याचं वागणं राज्यातील घटनात्मक पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही.”
तसेच मंत्रिमंडळामधील प्रमुख सदस्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखेविषयी कळवलं असून राज्यपालांना जर विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख द्यायला हवी, असेही राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती घेण्यासाठी मविआ नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली, मात्र तरीही राज्यपालांनी काहीच निर्णय घेतला नाही. अशी नाराजीही राऊतांनी व्यक्त केली.
दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणावरूनही राऊतांनी भाजपला सुनावले आहे. ते म्हणाले की, “माझे फोन अजूनही टॅप केले जात असून मात्र अजूनही मी माझा फोन नंबर बदललेला नाही, फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न देशभर राबवला जात आहे. राज्यात सत्ता आणायची असेल तर राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा आदींच्या माध्यमातून राजकारण केले जाते.”
महत्वाच्या बातम्या:
Russia-Ukraine war : खोट्या बातम्यांवर आवर आणण्यासाठी रशियाचा मोठा निर्णय; फेसबुकवर बंदी तर..
“महाराष्ट्रात सत्ता येत नाही म्हणून…”, फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
शेन वॉर्नच्या निधनानंतर सौरव गांगुलीचे चाहत्यांना आवाहन म्हणाला “आरोग्याला…”


