Share

तिसरी लाट कधी ? राज्यातील कोरोना रुग्णांची आठ लाखांवर जाण्याची भीती – टास्कफोर्स

Published On: 

मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली आहे.

पुढील २ ते ४ आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात येऊ शकते. तर याकाळात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८ लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे. तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे ८ लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं. यात लहान मुलांना देखील धोका असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

कोरोना नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज सांगताना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी अशी परिस्थिती याआधी ब्रिटनमध्ये दिसल्याचं सांगितलं. ब्रिटनमध्ये देखील दुसऱ्या लाटेनंतर केवळ ४ आठवड्यात तिसऱ्या लाटेचा संसर्ग पाहायला मिळालाय. सामान्यपणे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये १०० दिवस किंवा ८ आठवड्यांचं अंतर असल्याचं साथीरोग तज्ज्ञांचं मत आहे. हे अंतर पहिल्या लाटेचा शेवट ते पुढील लाटेचं उच्चांक असा आहे. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण व योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!