मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. यातच आता राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे.
या दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचं भाकित वर्तवण्यात आलंय. भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष… सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय.
दरम्यान, आता राष्ट्रवादीने देखील आरपारच्या लढाईची तयारी केल्याचे दिसून येत आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत करत असतील. पण कोणत्या पक्षाचं किती बळ आहे हे राज्यातील जनतेला माहिती आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, तिघांनी एकत्रित निवडणूक लढवणं हे फायद्याचं आहे. सध्या ते स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हणत असले तरी निवडणुका आल्यावर वेगळा विचार करू शकतात. पण तो नाहीच केला तर समविचारी पक्ष एकत्र राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तीच इच्छा आहे असं जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारमध्ये चाललंय काय ? भुजबळ -राऊत झाले आक्रमक,भाजपला होणार फायदा ?
- विधानसभा निवडणुकीपूर्वी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी योगी सरकारने आखली ‘ही’ रणनीती
- नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल
- ‘अरे हा तर फारूख शेख’ ; हिमेशचा जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
- सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया ? शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

