अहमदनगर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे विविध मुद्द्यांवरून पवार कुटुंबियांवर जहरी टीका करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकांमुळे गोपीचंद पडळकर हे कायमच चर्चेत असतात. दरम्यान, आता गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटूंबातील आणखी एका सदस्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
पडळकर यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या कामगिरीवर टीका करतानाच ते शरद पवारांचे सुधारित व्हर्जन असून शरद पवारांप्रमाणेच ते पुढील पिढयांना मातीत घालवतील असा घणाघात केला आहे. पडळकर आज कर्जतच्या दौऱ्यावर होते. श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर क्षेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
तर, ‘रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल,’ असा प्रहार पडळकर यांनी केलाय. रोहित पवारांच्या हाती असलेल्या बारातमी ऍग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्यांच्या खाद्याने मोठं नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचं देखील पडळकर यांनी अधोरेखित केलं आहे.
काय आहे बारामती ऍग्रोवर आरोप ?
रोहित पवार यांच्या बारामती एग्रो या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायातील व्यावसायिकांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. बारामती ऍग्रोचे फीड खाऊ घातल्याने कोंबड्यानी अंडी देणे बंद केल्याचा आरोप होऊ लागला आहे.यामुळे पुरंदरसह अनेक ठिकाणच्या पोल्ट्री व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. मात्र पवार हे कोणत्याही प्रकारे याची दखल घेत नसल्याचे शेतकरी आक्रोश करून सांगत आहेत. यातूनच अनेकांना रोहित पवार यांच्या कथनी आणि करणी यात फरक दिसू लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात आज कोरोना मृत्यूंमध्ये घट; तर ‘इतक्या’ रुग्णांची भर !
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- गोव्यातील लॉकडाऊन कधी उठणार? जाणून घ्या मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले..
- ‘…हा योगायोग नाही ! अटक होणारे शिवसेनेशी संबंधित कसे ?’; नितेश राणेंचा नेमका इशारा काय ?
- ‘महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा’, जयंत पाटलांनी मिसळला राऊतांच्या सुरात सूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

