Share

सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया ? शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. यातच आता राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे.

या दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचं भाकित वर्तवण्यात आलंय. भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष… सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय.

दरम्यान, कॉंग्रेसला राज्यात सोबत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही हे लक्षात आल्यावरच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी धूर्त खेळी करत कॉंग्रेसला महाविकास आघाडीत घेतले हे सत्य आहे. आता परिस्थिती अशी आहे की देशपातळीवर कॉंग्रेसच्या सत्तेचे अनेक गड उधवस्त होत असून कॉंग्रेसला म्हणावे तेवढे यश मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक नेते साथ सोडत असताना कॉंग्रेसला महाराष्ट्रात मजबूत करण्यासाठी नाना पटोले हे प्रयत्न करत आहेत. आगामी काळात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष कशा पद्धतीने सत्तेत येतील याची व्यूहरचना सुरु असून हीच खेळी ओळखून कॉंग्रेस स्वतः मजबूत होण्याचा प्रयत्न करत आहे.

सेना राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल या अग्रलेखातील वाक्यावरून आगामी काळात भाजप सोबत कॉंग्रेसचा देखील सफाया करण्याचा चंग आता शिवसेनेने बांधला असल्याचे दिसून येते. दरम्यान,पटोले यांना देखील चांगलेच ठाऊक आहे की भाजप हा थेट शत्रू असला तरीही कॉंग्रेसची राज्यात मुख्य स्पर्धा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच असणार आहे. खरतर राष्ट्रवादी-सेनेला सरकार स्थापन करताना देखील कॉंग्रेसला नाविलाज म्हणून सोबत घ्यावे लागले आहे. म्हणजे या दोन्ही पक्षांना कॉंग्रेस नकोच आहे असे म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. यातूनच आजच्या अग्रलेखातून शिवसेनेच्या जे पोटात आहे तेच आज ओठांवर आले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!