🕒 1 min read
मुंबई : गायक हिमेश रेशमिया याच्या गाण्याची चर्चा बऱ्याचदा होत असते. सध्या ही त्याचे एक नवीन गाण अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हिमेश रेशमियाचं नवं गाणं ‘सुरुर 2021’ सध्या सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत आहे. मात्र सध्या त्याच्या गाण्या सोबतच त्याच्या एका जुन्या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे.
हिमेश रेशमियाचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.या फोटोमध्ये हिमेश सोबत अल्का याज्ञिक सुद्धा दिसून येत आहेत. या फोटोमध्ये चेक्सचं शर्ट आणि ट्राउजर घातलेल्या या हिमेशला पाहून त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा आता जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे. हा फोटो पाहून सगळेच जण आश्चर्यचकीत झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CQFkIIgtk7Y/?utm_source=ig_embed&ig_rid=4a854d5d-b54a-47de-b370-226b0cecb42d
या फोटोमध्ये हिमेशला पाहून काही जण फारूख शेख म्हणत आहेत, तर काही जणांनी चक्क ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’मधला भिडे असल्याचं सांगत आहेत. अशा अनेक कमेंट्स सध्या त्याच्या फोटो वर येत आहेत. या फोटोला काही तासांमध्येच लाखो लाइक्स मिळाले आहेत. .
हिमेशने गाण्यासोबत कर्ज, रेडिओ, द एक्सपोज या चित्रपटांमध्सये देखील काम केले आहे. तर सध्या हिमेश रेशमिया ‘इंडियन आयडल १२’ शोमध्ये परिक्षक म्हणून कार्य करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
