मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारमध्ये समन्वय नसल्याचे वेळोवेळी समोर आहे.शासकीय निर्णय,शासनाची धोरणे यावरून अनेकदा या तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये खटके उडाले आहे. वेगवेगळ्या विचारसरणी असणारे हे तीन पक्ष एकत्र येत राज्यकारभार चालवत असल्याने हे होणारच होते मात्र आता एखाद्या वर्गासाठी सरकारमधील मंत्रीच जर टोकाची भूमिका घेत असतील तर नेमकं सरकारमध्ये काय चालले आहे असा सवाल उपस्थित होण्यामध्ये काहीही गैर नाही.
महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले. राजकीय आरक्षण कायम राहावे म्हणून आघाडी सरकारने पाठपुरावा सुरू केला. मागासावर्ग आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करून प्रक्रिया सुरू केली असली तरी इतर मागासवर्ग समाजात आरक्षण रद्द झाल्याने असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर आज मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून आज ते मोर्चा देखील नाशिकमध्ये काढणार आहेत. खरतर 14 महिने होऊनही इंपेरिकल डाटा महाविकास आघाडी सरकारने तयार केला नाही. तेवढेच काय स्वतः विजय वडेट्टीवार यांनी महिनाभरापूर्वी इंपेरिकल डाटातयार करण्याची घोषणा केली होती, तीही हवेत विरली असताना आता भुजबळ आंदोलन का करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसऱ्या बाजूला पदोन्नतीच्या आरक्षणावर २१ जून नंतर बोलणार असून या विषयावर महाराष्ट्र ढवळून काढणार, अशी माहिती देत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एल्गार पुकारला आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण असो, की मराठा समाजाचे आरक्षण असो. आरक्षण हे ज्या कारणास्तव देशाच्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलं, त्या कारणास्तव देत असताना हे आरक्षण थांबवून अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्यामुक्त जाती आणि बहुजन मागास समाजाला वेठीस धरणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल डॉ राऊत यांनी केला. या शुक्राचार्यांचे पितळ उघडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान,राज्यात सत्तेचा उपभोग घेणाऱ्या ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या वडेट्टीवार आणि पवार संघर्ष पाहायला मिळतो तर कधी राऊत-पवार असा संघर्ष पाहायला मिळतो. मंत्र्यांनी घेतलेल्या या टोकाच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचा सरकार मधील मंत्र्यांवर वचक नाही का ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे. या संघर्षाचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला होत असून आगामी काळात याचे गंभीर परिणाम देखील सरकारला भोगावे लागू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

